कोल्हार वार्ताहर - (पत्रकार प्रमोद कुंभकर्ण) पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याच्या वाटचालीत ट्रक संस्थेचे महत्त्वपूर्ण योगदान असून संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार राठी यांनी पारदर्शक उत्तम कारभार करून संस्थेच्या नावलौकिक वाढवला असे प्रतिपादन नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. प्रवरानगर येथील आमदार राधाकृष्ण विखे पाटील सहकारी ट्रक वाहतूक संस्थेची 46 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी ट्रक संस्थेच्या सभागृहात संपन्न झाली या प्रसंगी अध्यक्ष भाषणात नामदार विखे पाटील बोलत होते. यावेळी माजी आमदार अण्णासाहेब म्हस्के पाटील कारखान्याचे अध्यक्ष कैलास तांबे उपाध्यक्ष सतीश ससाने प्रवरा बँकेचे अध्यक्ष डॉक्टर भास्करराव खर्डे उपाध्यक्ष मच्छिंद्र थेटे बाजार समितीचे उपसभापती अण्णासाहेब कडू कारखान्याचे कार्यकारी संचालक अमोल पाटील शेतकी अधिकारी संजय मोरे जी.एन. चेचरे, किशोर आहेर, ट्रक वाहतूक संस्थेचे अध्यक्ष नंदकिशोर राठी,उपाध्यक्ष सुनील जाधव, संचालक बाळासाहेब गोरे, दत्तात्रय शिंदे, प्रमोद नालकर ,मारुती गायकवाड,मुकुंद तांबे शिवाजी इलग, भारत वाकचौरे, वाहिद पटेल तबाजी लोखंडे अलका गरगडे मंदाबाई रांधवणे,संभाजी देवकर, भगवान इलग, संपतराव म्हस्के साहेबराव दळे अशोकराव आहेर विजय लगड चंद्रकांत म्हस्के संस्थेचे व्यवस्थापक जालिंदर खर्डे,राजू म्हैसकर, सुखदेव गागरे अजय गाडेकर सचिन शास्त्री विजया कदम सिकंदर शेख, भरत कापसे लक्ष्मण मनकर, पत्रकार प्रमोद कुंभकर्ण आदीसह ट्रक संस्थेचे सर्व सभासद ट्रक मालक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नामदार विखे म्हणाले गेले पंचवीस वर्षापासून नंदकिशोर आरती हे संस्थेचे अध्यक्षपदाची दोरा सांभाळत आहे त्यांच्या कार्यकाळात ट्रक मालकांच्या हिताच्या अनेक चांगले निर्णय त्यांनी घेतले काटकसरणी व पारदर्शक कारभार करून संस्थेचा विस्तार वाढवला संस्थेच्या उत्पन्न वाढीसाठी नंदकिशोराटी यांनी विविध योजना राबवल्या असे सांगून यावर्षीचा गळीत हंगाम सुरू करण्यासाठी सर्व विभागाने तयारी करावी तोडणी व वाहतूक कंत्राटदार यांच्यासाठी कारखान्याने यावर्षी नवीन धोरण राबवले आहे प्रामाणिकपणे ट्रक व्यवसाय करणाऱ्या ट्रक मालकांना याचा निश्चितच फायदा होईल. सभेचे प्रास्ताविक उपाध्यक्ष सुनील जाधव यांनी केले अहवाल वाचन ट्रक संस्थेचे मॅनेजर जालिंदर खर्डे यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रमोद नालकर यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post